भरती अपडेट्स 📢
अधिसूचना, हॉल तिकीट, परीक्षा दिनांक, निकाल — सर्व ताज्या बातम्या एका ठिकाणी. अॅपमध्ये तुमच्या जिल्ह्याचे पुश अलर्ट मिळतात.
जिजाई अॅप नवीन अपडेट: १४,०००+ प्रश्नसंच व झटपट ई-मेल OTP लॉगिन!
जिजाई अॅपमध्ये आता १४,००० हून अधिक सराव प्रश्न (गणित, बुद्धिमत्ता, मराठी व्याकरण, चालू घडामोडी) आणि २०२६ च्या जिल्हावार खऱ्या प्रश्नपत्रिका (पुणे, ठाणे, नवी मुंबई, रायगड, अकोला इ.) उपलब्ध झाल्या आहेत. सोबतच आता ६-अंकी ई-मेल OTP द्वारे झटपट व सुरक्षित लॉगिन सुविधा उपलब्ध आहे.
🚢 भारतीय नौदलात INS Nipun चे औपचारिक जलावरण (३१ ऑगस्ट)
३१ ऑगस्ट २०२६ रोजी मुंबईतील नेव्हल डॉकयार्ड येथे भारतीय नौदलाची दुसरी स्वदेशी बनावटीची डायव्हिंग सपोर्ट व्हेसल (DSV) 'INS Nipun' हिचे औपचारिक जलावरण करण्यात आले. बांधणी: हिंदुस्थान शिपयार्ड लिमिटेड (HSL, विशाखापट्टणम). परीक्षेसाठी लक्षात ठेवा: INS Nipun = Diving Support Vessel (DSV).
🏑 राष्ट्रीय क्रीडा दिवस (२९ ऑगस्ट) - मेजर ध्यानचंद जयंती
हॉकीचे जादूगार मेजर ध्यानचंद यांच्या जयंतीनिमित्त दरवर्षी २९ ऑगस्ट रोजी राष्ट्रीय क्रीडा दिवस (National Sports Day) साजरा केला जातो. जन्म: २९ ऑगस्ट १९०५. ऑलिम्पिक सुवर्ण: १९२८, १९३२, १९३६. सर्वोच्च क्रीडा पुरस्कार: मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार (पूर्वी: राजीव गांधी खेलरत्न).
🏦 प्रधानमंत्री जनधन योजनेला १२ वर्षे पूर्ण (२८ ऑगस्ट)
२८ ऑगस्ट २०२६ रोजी 'प्रधानमंत्री जनधन योजनेला' (PMJDY) १२ वर्षे पूर्ण झाली. २८ ऑगस्ट २०१४ रोजी सुरुवात. यश: ५९ कोटींपेक्षा जास्त शून्य-शिल्लक बँक खाती. घोषवाक्य: 'मेरा खाता भाग्य विधाता'.
🚫 शासकीय कार्यालयांतील बेकायदेशीर प्रतिनियुक्ती रद्द (२५ ऑगस्ट)
महाराष्ट्र मुख्य सचिव सुजाता सौनिक यांनी २५ ऑगस्ट २०२६ रोजी मंत्रालयीन विभागांत नियमाबाह्यरीत्या उसनवारी केलेल्या सर्व नियुक्त्या तात्काळ रद्द करण्याचे आदेश दिले. सुजाता सौनिक या महाराष्ट्राच्या पहिल्या महिला मुख्य सचिव आहेत.
🕊️ सद्भावना दिवस (२० ऑगस्ट) - राजीव गांधी जयंती
२० ऑगस्ट रोजी भारताचे माजी पंतप्रधान राजीव गांधी यांची जयंती 'सद्भावना दिवस' (Sadbhavana Diwas) म्हणून साजरी केली जाते. राजीव गांधी: भारताचे ६ वे पंतप्रधान (सर्वात तरुण, वय ४०). ६१ वी घटनादुरुस्ती (१९८८) — मतदान वय २१ वरून १८ वर्षे.
🇮🇳 ८० वा स्वातंत्र्यदिन (१५ ऑगस्ट २०२६)
१५ ऑगस्ट २०२६ रोजी भारताचा ८० वा स्वातंत्र्यदिन साजरा झाला. लाल किल्ल्यावरून पंतप्रधानांनी ध्वजारोहण केले. 'हर घर तिरंगा' मोहीम, केंद्रीय गृहमंत्री पदक व राष्ट्रपती पोलीस पदक विजेत्यांची घोषणा. लक्षात ठेवा: स्वातंत्र्य — १५ ऑगस्ट १९४७.
🏅 ग्लासगो राष्ट्रकुल स्पर्धा २०२६ - भारताची ३९ पदकांची कामगिरी
स्कॉटलंडमधील ग्लासगो येथे राष्ट्रकुल स्पर्धा २०२६ मध्ये भारताने १३ सुवर्ण, १७ रौप्य व ९ कांस्य पदकांसह ३९ पदके जिंकून पदकतालिकेत ४ थे स्थान (१ ले: ऑस्ट्रेलिया). मीराबाई चानू — भारोत्तोलनात सलग तिसरे सुवर्णपदक (Hat-trick).
🚀 ISRO — SSLV-D3 द्वारे EOS-08 उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण
ISRO ने श्रीहरिकोटा येथून SSLV-D3 प्रक्षेपकाद्वारे EOS-08 (Earth Observation Satellite) उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण केले. ISRO अध्यक्ष: एस. सोमनाथ. मुख्यालय: बेंगळुरू (कर्नाटक). स्थापना: १५ ऑगस्ट १९६९.
🇮🇳 राष्ट्रीय हातमाग दिवस (७ ऑगस्ट) - स्वदेशी चळवळीची आठवण
दरवर्षी ७ ऑगस्ट रोजी राष्ट्रीय हातमाग दिवस (National Handloom Day) साजरा केला जातो. ऐतिहासिक संदर्भ: ७ ऑगस्ट १९०५ रोजी बंगालच्या फाळणीविरोधात स्वदेशी चळवळ सुरू. सुरुवात: २०१५ (पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते).
नवीन मेगा पोलीस भरती 2026-27: 20,000+ जागा अपेक्षित!
महाराष्ट्रात पुढील पोलीस भरती 2026-27 मध्ये 20,000 पेक्षा जास्त जागांची मेगा भरती होण्याची दाट शक्यता आहे. जाहिरात नोव्हेंबर-डिसेंबर 2026 दरम्यान येण्याचा अंदाज आहे. पदे: पोलीस शिपाई, चालक, SRPF, कारागृह शिपाई, बँडस्मन. आतापासूनच मैदानी व लेखी तयारी सुरू करा!
नवीन भरतीच्या हालचाली सुरू — रिक्त पदांचे परिपत्रक जारी!
अपर पोलीस महासंचालक (प्रशिक्षण), मुंबई यांनी परिपत्रक काढून पोलीस शिपाई, चालक, SRPF सशस्त्र शिपाई, बँडस्मन व कारागृह शिपाई संवर्गातील रिक्त पदांची माहिती मागवली आहे. आगामी मेगा भरती प्रक्रियेची ही पूर्वतयारी मानली जाते — तयारी जोमाने सुरू ठेवा!
MPSC गट-क भरती 2026: 2,639 पदे
MPSC ने गट-क संयुक्त पूर्व परीक्षा 2026 ची जाहिरात प्रसिद्ध केली आहे. एकूण 2,639 पदे. पूर्व परीक्षा: रविवार, 27 सप्टेंबर 2026. पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हा अभ्यासक्रम बराचसा समान असल्याने ही चांगली संधी आहे.
अधिकृत भरती पोर्टल — अर्ज, प्रवेशपत्र, निकाल
पोलीस भरतीचे ऑनलाइन अर्ज, प्रवेशपत्र आणि जिल्हानिहाय निकाल या एकाच अधिकृत पोर्टलवर मिळतात. भरतीबाबतची कोणतीही माहिती नेहमी अधिकृत पोर्टलवरूनच खात्री करा — अफवांवर विश्वास ठेवू नका.
मुंबई पोलीस भरती: निवड यादी जाहीर!
पोलीस भरती 2024-25 (राज्यभर 15,300+ जागा) अंतर्गत मुंबई पोलीस भरतीची निवड यादी जाहीर झाली आहे. PDF मध्ये तुमचा रोल नंबर Search करून तपासा. पुढील टप्पा: कागदपत्र पडताळणी आणि वैद्यकीय चाचणी.
FIFA विश्वचषक 2026 सुरू — इतिहासातील सर्वात मोठा!
FIFA फुटबॉल विश्वचषक 2026 ची सुरुवात 11 जूनला मेक्सिको सिटी येथे झाली. प्रथमच 3 देश यजमान: अमेरिका, कॅनडा, मेक्सिको. प्रथमच 48 संघ आणि 104 सामने. परीक्षेसाठी लक्षात ठेवा: 23वा विश्वचषक, 16 शहरांमध्ये सामने.
फ्रेंच ओपन 2026 चे विजेते
फ्रेंच ओपन 2026 (24 मे – 7 जून): पुरुष एकेरी – अलेक्झांडर झ्वेरेव्ह (जर्मनी); 1996 नंतर ग्रँडस्लॅम जिंकणारा पहिला जर्मन पुरुष खेळाडू. महिला एकेरी – मिरा आंद्रेवा (रशिया); 1992 नंतरची सर्वात तरुण फ्रेंच ओपन विजेती (वय 19). दोघेही प्रथमच ग्रँडस्लॅम विजेते ठरले.
महिला T20 विश्वचषक 2026: ऑस्ट्रेलिया विक्रमी 7व्यांदा विजेता
लंडनच्या लॉर्ड्स मैदानावर झालेल्या अंतिम सामन्यात (5 जुलै 2026) ऑस्ट्रेलियाने यजमान इंग्लंडचा 7 गडी राखून पराभव करत विक्रमी 7वे महिला T20 विश्वचषक विजेतेपद पटकावले. विजेता – ऑस्ट्रेलिया, उपविजेता – इंग्लंड, स्थळ – लॉर्ड्स.
IPL 2026: RCB चा विजेतेपदाचा दुसरा करंडक!
रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूने (RCB) अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर गुजरात टायटन्सचा 5 गडी राखून पराभव करत सलग दुसरे IPL विजेतेपद पटकावले (31 मे 2026). विराट कोहलीने 42 चेंडूत 75 धावा केल्या. विजेता – RCB, उपविजेता – गुजरात टायटन्स.
महाराष्ट्र शासन निर्णय (GR) अधिकृत पोर्टल
भरती, आरक्षण, वयोमर्यादा यासारख्या विषयांवरील अधिकृत शासन निर्णय (GR) येथे प्रसिद्ध होतात. परीक्षेत शासन निर्णयांवर प्रश्न विचारले जातात — महत्त्वाचे GR वाचण्याची सवय लावा.
हॉल तिकीट आले की लगेच कळेल 🔔
जिजाई अॅपमध्ये तुमच्या जिल्ह्याचे भरती अलर्ट — अधिसूचना, हॉल तिकीट, निकाल थेट फोनवर.
Google Play वर मिळवा