जिजाई लोगो जिजाई
२५ गुण · सर्वाधिक स्कोअरिंग विषय 2,181+ सत्यापित PYQ प्रश्न

पोलीस भरती मराठी व्याकरण प्रश्न व उत्तरे (MCQ सराव)

पोलीस भरतीत २५ पैकी २३+ गुण मिळवून देणारा सर्वात महत्त्वाचा विषय — घटकनिहाय आराखडा, १० प्रश्नांची मोफत ऑनलाइन चाचणी आणि १० अतिरिक्त स्पष्टीकरणासह प्रश्न.

मराठी व्याकरण मोफत सराव टेस्ट — १० प्रश्न

मागील पोलीस भरती स्मरणाधारित प्रश्नांवर आधारित · अचूक उत्तर व स्पष्टीकरण

प्रश्न 1 / 10 ⏱️ 00:00
मराठी व्याकरण संदर्भ: Ahilyanagar 2023 (स्मरणाधारित)

इंग्रजी 'Selfie' (सेल्फी) या शब्दासाठी मराठीतील योग्य शब्द कोणता आहे?

मराठी व्याकरणाचे ६ सर्वाधिक विचारले जाणारे घटक

खालील सहा घटकांचा पद्धतशीर अभ्यास केल्यास मराठी व्याकरणाचे जवळपास ८५–९०% प्रश्न सहज सुटतात:

📌 शब्दांच्या जाती

नाम, सर्वनाम, विशेषण, क्रियापद, क्रियाविशेषण, शब्दयोगी, उभयान्वयी, केवलप्रयोगी अव्यय

📌 संधी व समास

स्वरसंधी, व्यंजनसंधी, विसर्गसंधी; अव्ययीभाव, तत्पुरुष, द्वंद्व, बहुव्रीही समास

📌 प्रयोग व काळ

कर्तरी, कर्मणी, भावे प्रयोग; वर्तमान, भूत व भविष्यकाळाचे उपप्रकार

📌 अलंकार व वृत्त

उपमा, उत्प्रेक्षा, रूपक, यमक, अनुप्रास, अतिशयोक्ती, विरोधाभास अलंकार

📌 शब्दसंग्रह व शुद्धलेखन

समानार्थी, विरुद्धार्थी, शब्दसमूहाबद्दल एक शब्द, पारिभाषिक शब्द, अचूक शुद्धलेखन

📌 म्हणी व वाक्प्रचार

दरवर्षी सर्वाधिक विचारले जाणारे मराठी म्हणी व वाक्प्रचारांचे नेमके अर्थ

अधिक १० महत्त्वाचे मराठी व्याकरण प्रश्न (उत्तरे व स्पष्टीकरण)

प्रत्येक प्रश्नाखालील "उत्तर व स्पष्टीकरण पहा" वर टॅप करून तुमची तयारी तपासा (स्रोत: स्मरणाधारित PYQ संच).

मराठी व्याकरण Ahilyanagar 2023

11 खालीलपैकी कोणता एक दागिना आहे?

  1. A. बाजूबंद
  2. B. नजरबंद
  3. C. धरबंद
  4. D. यापैकी नाही
✅ उत्तर व स्पष्टीकरण पहा ▾

बरोबर उत्तर: A. बाजूबंद

स्पष्टीकरण व उकल:
हातात बांधायचा स्त्रियांचा दागिना बाजूबंद आहे (पर्याय A).
मराठी व्याकरण Ahilyanagar 2023

12 शेतातील पाखरे भिरकावून पळवण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या दोरीच्या साधनाचे नाव काय?

  1. A. दावण
  2. B. मापण
  3. C. रापण
  4. D. गोफण
✅ उत्तर व स्पष्टीकरण पहा ▾

बरोबर उत्तर: D. गोफण

स्पष्टीकरण व उकल:
पाखरे हाकलण्यासाठी वापरले जाणारे साधन गोफण होय (पर्याय D).
मराठी व्याकरण Ahilyanagar 2023

13 'एळकोट' (यळकोट) हा शब्द कोणत्या लोकदैवताच्या पूजेच्या वेळी उच्चारला जातो?

  1. A. हनुमान
  2. B. खंडोबा
  3. C. विष्णु
  4. D. शंकर
✅ उत्तर व स्पष्टीकरण पहा ▾

बरोबर उत्तर: B. खंडोबा

स्पष्टीकरण व उकल:
'यळकोट यळकोट जय मल्हार' हा जयघोष श्री खंडोबा दैवताशी संबंधित आहे (पर्याय B).
मराठी व्याकरण Ahilyanagar 2023

14 'शाडू' म्हणजे नेमके काय असते?

  1. A. विटेचा प्रकार
  2. B. वाळू
  3. C. सीमेंट
  4. D. माती
✅ उत्तर व स्पष्टीकरण पहा ▾

बरोबर उत्तर: D. माती

स्पष्टीकरण व उकल:
मूर्ती बनवण्यासाठी वापरली जाणारी मऊ माती म्हणजे शाडूची माती (पर्याय D).
मराठी व्याकरण Ahilyanagar 2023

15 मी निबंध लिहीत असतो. या वाक्यातील काळ ओळखा.

  1. A. साधा वर्तमानकाळ
  2. B. साधा भूतकाळ
  3. C. रीती वर्तमानकाळ
  4. D. भविष्यकाळ
✅ उत्तर व स्पष्टीकरण पहा ▾

बरोबर उत्तर: C. रीती वर्तमानकाळ

स्पष्टीकरण व उकल:
वर्तमानकाळातील सवय व्यक्त झाल्याने हा रीती वर्तमानकाळ आहे (पर्याय C).
मराठी व्याकरण Ahilyanagar 2023

16 'उंदीर' या नामाचे अनेकवचन काय होईल?

  1. A. उंदीर
  2. B. उंदरे
  3. C. उंदिरे
  4. D. यापैकी नाही
✅ उत्तर व स्पष्टीकरण पहा ▾

बरोबर उत्तर: A. उंदीर

स्पष्टीकरण व उकल:
एकवचन उंदीर ⇒ अनेकवचन उंदीर च राहते (पर्याय A).
मराठी व्याकरण Ahilyanagar 2023

17 'धरादेश' हा शब्द कोणत्या संधीचे उदाहरण आहे?

  1. A. स्वरसंधी
  2. B. विसर्गसंधी
  3. C. व्यंजनसंधी
  4. D. हलसंधी
✅ उत्तर व स्पष्टीकरण पहा ▾

बरोबर उत्तर: A. स्वरसंधी

स्पष्टीकरण व उकल:
धरा + आदेश = धरादेश (स्वरसंधी) (पर्याय A).
मराठी व्याकरण Ahilyanagar 2023

18 'सुतोवाच करणे' या वाक्प्रचाराचा अचूक अर्थ कोणता?

  1. A. पर्वा करणे
  2. B. संपविणे
  3. C. प्रारंभ करणे / पूर्वपीठिका सांगणे
  4. D. दोष देणे
✅ उत्तर व स्पष्टीकरण पहा ▾

बरोबर उत्तर: C. प्रारंभ करणे / पूर्वपीठिका सांगणे

स्पष्टीकरण व उकल:
सुतोवाच करणे म्हणजे प्रारंभ करणे किंवा पुढे घडणाऱ्या गोष्टीची पूर्वकल्पना देणे (पर्याय C).
मराठी व्याकरण Ahilyanagar 2023

19 गुरुजी म्हणाले, की प्रत्येकाने नियमितपणे शाळेत यावे. वाक्यप्रकार ओळखा.

  1. A. केवलवाक्य
  2. B. मिश्रवाक्य
  3. C. संयुक्तवाक्य
  4. D. यापैकी नाही
✅ उत्तर व स्पष्टीकरण पहा ▾

बरोबर उत्तर: B. मिश्रवाक्य

स्पष्टीकरण व उकल:
'की' या स्वरूपबोधक उभयान्वयी अव्ययाने जोडल्याने हे मिश्रवाक्य आहे (पर्याय B).
मराठी व्याकरण Ahilyanagar 2023

20 हे "माझे" पुस्तक आहे. वाक्यातील अधोरेखित शब्दाची विभक्ती ओळखा.

  1. A. सप्तमी
  2. B. प्रथमा
  3. C. संबोधन
  4. D. षष्ठी
✅ उत्तर व स्पष्टीकरण पहा ▾

बरोबर उत्तर: D. षष्ठी

स्पष्टीकरण व उकल:
माझे ('झा, जी, जे, मा' प्रत्यय) हे षष्ठी विभक्ती चे रूप आहे (पर्याय D).

मराठी व्याकरण — प्रश्नोत्तरे

पोलीस भरती लेखी परीक्षेत मराठी व्याकरणाला किती गुण असतात? +

मागील अधिकृत भरती प्रक्रियेनुसार १०० गुणांच्या लेखी परीक्षेत मराठी व्याकरण या विषयासाठी साधारण २५ प्रश्न (२५ गुण) विचारले जातात. अचूक अभ्यासाने या विषयात २३ ते २५ गुण मिळवणे सहज शक्य असते.

मराठी व्याकरणात कोणते घटक सर्वाधिक महत्त्वाचे आहेत? +

मागील जिल्हावार प्रश्नपत्रिकांच्या विश्लेषणावरून समानार्थी-विरुद्धार्थी शब्द, म्हणी व वाक्प्रचार, शुद्धलेखन, प्रयोग, समास, संधी, शब्दांच्या जाती आणि अलंकार यांवर सर्वाधिक प्रश्न येतात.

मराठी व्याकरणाचे आणखी प्रश्न कुठे सोडवता येतील? +

या पानावर २० निवडक प्रश्न मोफत सोडवता येतात. आमच्या प्रश्नपेढीत मराठी व्याकरणाचे 2,181+ स्मरणाधारित PYQ व सराव प्रश्न स्पष्टीकरणासह जिजाई अ‍ॅपमध्ये उपलब्ध आहेत.

मराठी व्याकरणाचे 2,181+ प्रश्न सोडवा

प्रत्येक घटकाचा विषयवार सराव, चुकांची उजळणी (Mistake Bank) आणि ऑफलाइन मोड — जिजाई अ‍ॅपमध्ये.

Google Play वर मिळवा